कोल्हापुरात फुटबॉल सामन्यात प्रेक्षक गॅलरीत तुंबळ हाणामारी   

कोल्हापुर : शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळच्या सामन्यादरम्यान समर्थकामध्ये प्रेक्षक गॅलरीत फ्रीस्टाईल हाणामारी झाली. सामना संपल्यानंतर देखील स्टेडियमच्या बाहेर जोरदार राडा झाला. क्रिकेटवेड्या देशात कोल्हापुरात फुटबॉल वेड नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, याच कोल्हापुरात गेल्या काही वर्षात फुटबॉलवरून होणारा वाद टोकाला गेला आहे.या वादातून खेळ आणि कोल्हापूरचं नाव मलिन होत आहे.
 
सध्या कोल्हापुरात अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे.काल झालेल्या शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळच्या सामन्यादरम्यान समर्थकामध्ये प्रेक्षक गॅलरीत फ्रीस्टाईल हाणामारी झाली.
 
यावेळी भर मैदानात एका प्रेक्षकाला मिळून सर्वांनी मारहाण केली. यावेळी सुरक्षारक्षक अडवताना दिसून आले. मात्र, मारहाण होतच राहिली. सामना संपल्यानंतर देखील स्टेडियमच्या बाहेर जोरदार राडा झाला.यावेळी दंगल नियंत्रण पथक आणि जुना राजवाडा पोलिसांनी सौम्य लाठीमार करून समर्थकांना पांगवलं. मैदानात खेळाडूंची मारामारी होत असल्याने कोल्हापूर फुटबॉल पुरता बदनाम झाला आहे.पेठांमधील इर्ष्येनं कोल्हापुरात फुटबॉल हा खेळ राहिला तो खुन्नस म्हणून कुपरिचित झाला आहे.
 

Related Articles